धक्कादायक, नगरमध्ये आढळले ‘निझामुद्दीन रिटर्न’मधील 24 जण!


अहमदनगर : संपूर्ण महाराष्ट्रातून 136 जण दिल्लीतील निझामुद्दीन येथे आयोजित तबलीग जमात परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यातील 24 जण हे अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचे समोर आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हे 136 जण महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच दिल्लीवरून परत आलेले 24 जण हे नगरमधील असल्याचे समोर आले आहे. नगर प्रशासनाने त्यातील 10 जणांना मंगळवारी नेवासा येथून शासकीय रुग्णालयात आणले. तर उर्वरीत 14 जणांची आधीच ओळख पटवली होती. जामखेडमध्ये या 14 जणांनी 144 चे उल्लंघन करत नमाज घेतली म्हणून कारवाई केली होती. त्यांची कसून चौकशी केली असता दिल्लीच्या प्रवासाची माहिती समोर आली. त्यामुळे प्रशासनाने या 14 जणांची वैद्यकीय तपासणी केली असता 14 पैकी 2 जण निगेटिव्ह आढळले आहे. तर संपर्कात आलेल्या 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे धोका अधिकच वाढला आहे. दिल्लीवरून हे 14 जण मुंबईला आले होते. तेथून त्यांनी चेन्नई ते अहमदनगर असा प्रवास केला. नगरमध्ये आल्यानंतर संगमनेर, राहुरी, जामखेड आणि पुन्हा नगर असा प्रवास केला होता.

तर दुसरीकडे निझामुद्दीन रिटर्नपैकी 36 जण हे पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा पुणे पोलिसांच्या 40 पथकांकडून शोध घेण्यात आला आहे. निझामुद्दीन येथून परतलेल्या 136 पैकी 36 जण पुण्यातील आहेत. 36 पैकी 30 जण पुणे शहराच्या विविध भागात राहतात तर 3 जण पिंपरी आणि 3 जण हे पुणे ग्रामीण भागात राहतात. आज या 30 जणांना हॉस्पिटलमधील विलगीकरण वार्डात ठेवण्यात आले आहे. तसंच इतरांचा शोध सुरू आहे.

Leave a Comment