काय आहे तबलीगी जमात ?, ज्यात सहभागी झालेल्यांना झाली कोरोनाची लागण

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात आहेत. त्यातच सोमवारी तेलंगानात 6 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचे बातमीने नागरिकांमध्ये भिती निर्माण केली आहे. हे सर्व कोरोनाग्रस्त दिल्लीत आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परतले होते. यांच्या मृत्यूनंतर तबलीगी जमात शब्द चर्चेत आला आहे.

काही दिवसांपुर्वीच दिल्लीच्या निझामुद्दीन येथे तबलीगी जमात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात जवळपास 400 लोक सहभागी झाले होते. आतापर्यंत 24 लोक कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 200 जणांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या कार्यक्रमात लोक सहभागी झाले होते त्याचे नाव मरकज तबलीगी जमा आहे.

काय आहे तबलीगी जमात आणि मरकज ?

मरकज, तबलीगी जमात या शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे. तबलीगीचा अर्थ अल्लाहाच्या संदेशाचा प्रसार करणे. जमातचा अर्थ समूह आणि मरकजचा अर्थ बैठकीसाठीची एक जागा, असा होतो. तबलीगी जमातशी संबंधित लोक पारंपारिक इस्लामला मानतात व याचा प्रचार-प्रसार करतता. याचे मुख्यालय दिल्लीच्या निझामुद्दीन येथे आहे.

कशी झाली याची सुरुवात ?

तबलीगी जमातची सुरूवात मुस्लिमांनी आपला धर्म कायम ठेवणे व इस्लामचा प्रचार-प्रसार व माहिती देण्यासाठी केली. मुघल काळात अनेकांनी इस्लाम धर्म स्विकारला होता. मात्र त्यानंतर देखील लोक हिंदू परंपरेत परतत होते. यामुळे मौलाना इलियास कांधलवी यांनी इस्लामचे शिक्षण देण्यास सुरूवात केली.

तबलीगी जमात आंदोलन 1927 ला मुहम्मद इलियास अल-कांधलवी यांनी भारतात हरियाणातील नूंह जिल्ह्यातून केली होती. या जमातीचे काम आज जगभरात 213 देशात पसरलेले आहे.

कसे करते काम ?

तबलीगी जमातच्या मरकजीतूनच वेगवेगळ्या भागांसाठी जमात निघते. यात कमीत कमी 3 ते 4 महिन्यांपर्यंत जमात निघते. जमातमध्ये सहभागी लोक दिवसभर शहरात फिरतात व लोकांना जवळील मस्जिदमध्ये येण्यास सांगतात. सकाळी हदीस वाचणे, नमाज आणि रोजा ठेवण्यावर यांचा जोर असतो.

Leave a Comment