सावधान ! फेक आयडी बनवून कोरोनाग्रस्तांसाठी मदत मागत आहेत हॅकर्स

कोरोना व्हायरसमुळे देशभरातील अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद आहेत. मात्र अशा स्थितीत देखील हॅकर्स लोकांना निशाणा बनवत आहेत. हॅकर्स पीएम रिलीफ फंडच्या नावाला साम्य असणारे आयडी बनवून कोरोना पीडितांच्या मदतीच्या नावाने पैसे मागत आहेत.

एसबीआय बँकेने या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हॅकर्सनी पीएम केअर @एसबीआय नावाने फेक आयडी बनवले होते व या आयडीद्वारे ऑनलाईन मदत करण्यास सांगत होते. पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल केली असून, हॅकर्सचा तपास सुरू आहे.

पोलिसांनुसार, सायबर सेलला तक्रार मिळाली आहे. कोरोना पीडीतांची मदत करण्यासाठी पीएम केअर्स नावाने आयडी बनवण्यात आली आहे. लोक कोरोनाशी लढण्यासाठी यात पैसे दान करत आहेत. मात्र हॅकर्स याच नावाशी साम्य असलेले पीएम केअर@एसबीआय नावाने आयडी बनवली असून, ही आयडी फेक आहे. यामध्ये पैसे टाकू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सोशल मीडियावर अशा अनेक फेक लिंक असून, तुम्हाला एखादा मेसेज आल्यास त्यातील लिंकवर क्लिक करू नये. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.

Leave a Comment