सलाम ! ही व्यक्ती परप्रांतीय मजूरांसाठी ठरली देवदूत

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम घर सोडून इतर राज्यात काम करण्यासाठी आलेल्या मजूरांवर झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात या मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र अशातच एखादी व्यक्ती या मजूरांसाठी देव बनून मदतीला धावून येत आहे.

असेच एक केरळमधील 60 वर्षीय माजी टेलिकॉम ऑपरेटर अब्दुल खादर या मजूरांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. अब्दुल यांनी बिहार आणि झारखंड येथून काम करण्यासाठी आलेल्या 131 मजूरांना आश्रय दिला आहे व त्यांना दररोज जेवण देखील देत आहेत.

अब्दुल यांनी या मजूरांना राहण्यासाठी 10 हॉलच्या आकारची रुम दिली आहे. यात टिव्ही, फॅन, किचन आणि 10 शौचालय देखील आहेत. मागील 10 दिवसांपासून ते या मजूरांना जेवण देखील देत आहे. अब्दुल यांनी यासाठी भांडी भाड्याने आणली आहेत व मजूरांना जेवणात ते भात, डाळ आणि सोयाबिन देत आहेत.

मजूरांच्या जेवणासाठी अब्दुल दररोज स्वतः 8 हजार रुपये खर्च करत आहेत. अशाप्रकारे मागील 10 दिवसात त्यांनी 80 हजार रुपये खर्च केले आहेत.

या खर्चाविषयी ते म्हणाले की, मला याचे काहीही वाटत नाही. कारण एकेकाळी मी सुद्धा त्यांच्या जागी होतो. जेव्हा मी लॉकडाऊनबद्दल ऐकले, त्यावेळी त्यांची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. उद्या कोरोनामुळे मला काही झाले तर ? पैसे सर्वोत्तम गोष्ट जर काही करत असेल, तर म्हणजे उपाशी व्यक्तीचे पोट भरणे.

40 वर्षांपुर्वी अब्दुल यांनी दुबईमध्ये हॉटेलमध्ये देखील टेबल पुसण्याचे देखील काम केले. नंतर त्यांनी अरबी शिकत अल एन युनिवर्सिटीमध्ये 30 वर्ष टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम केले. 4 वर्षांपुर्वी ते निवृत्त झाले आहेत.

Leave a Comment