लॉकडाऊन दरम्यान दुबईतील लोकांचे पोट भरत आहे हा भारतीय

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशा परिस्थिती भारतापासून लांब असलेला मुरली शबनथम हा भारतीय दुबईमध्ये हिरो ठरत आहे. मुरली दररोज आपल्या बाईकने घरात लॉकडाऊन असणाऱ्यांपर्यंत जेवण पोहचवत आहे.

यूएईमध्ये कोरोना व्हायरसची संख्या 500 च्या पुढे गेली असून, 5 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मागील 15 दिवसांपासून दुबईमध्ये असलेला 42 वर्षीय मुरली तेथील लोकांपर्यंत जेवण पोहचवत आहे.

मुरलीने सांगितले की, कधी विचार केला नव्हता की, हे दिवस देखील पाहायला मिळेल. मात्र या गोष्टीचा आनंद आहे की या संकटाच्या काळात लोकांपर्यंत जेवण पोहचवत आहे.

त्याने सांगितले की, जेवण पोहचवताना तो सुरक्षेची विशेष काळजी घेतो. तो मास्क आणि हातमोजे घालतो. याशिवाय जेवणाचा डब्बा हातात घेण्यापुर्वी सॅनिटायझ लावण्यास विसरत नाही. त्याला आनंद आहे की कामामुळे तो तामिळनाडूमधील आपल्या कुटुंबाची देखभाल करत आहे.

Leave a Comment