कोरोना व्हायरसच्या महामारीने जगभरात थैमान घातले आहे. या परिस्थिती सर्वांनीच विशेष काळजी घेत, घराबाहेर पडणे टाळणे गरजेचे आहे. अशा स्थितीमध्ये खासकरून वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण त्यांना संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
कोरोना : वृद्धांनी घ्यावी विशेष काळजी
याशिवाय तुमच्या सहकार्याला, सोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तीला किंवा घरात राहणाऱ्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास तुम्ही देखील संक्रमित होण्याची शक्यता असते. या काळात 14 दिवसात कोरोनाची लक्षण दिसू लागतात. वृद्ध व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण त्यांना या व्हायरसची लागण लगेच होऊ शकते.
सुरुवातीला ताप, सर्दी आणि खोकला होऊ शकतो. संक्रमण वाढल्यावर निमोनिया, श्वास घेण्यास त्रास आणि सेप्टिक शॉक देखील होऊ शकतो. गंभीर लक्षण असणाऱ्यांना आयसीयूमध्ये भर्ती केले जाते. तर थोडीफार लक्षण असणाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती केले जात नाही.
लक्षण –
सामान्य आजार – श्वसनाच्या नळीत व्हायरल इंफेक्शनचे लक्षण दिसणे. ताफ, कफ, घसा खवखवणे, डोके दुखी इत्यादी लक्षण दिसतात.
हलका निमोनिया – खासकरून लहान मुलांमध्ये श्वास घेण्यास समस्या, जोरजोरात श्वास घेणे, खोकला यासारखी लक्षण दिसतात.
गंभीर निमोनिया – वयस्क लोकांमध्ये ही स्थिती दिसते. ताप, श्वास घेण्यास संबंधी लक्षण दिसतात. श्वसन दर प्रति मिनिट 30 पेक्षा अधिक होतो.
सेप्सिस – या स्थितीमध्ये शरीराचे अंगांना काम करण्यास समस्या येते. वयस्क लोकांना मानसिक स्थिरता, श्वास घेण्यास त्रास, मूत्र विसर्जन कमी, ह्रदयाची गती वाढणे, कमी रक्तदाब, थंडी वाजणे इत्यादी लक्षण दिसतात.
सेप्टिक शॉक – वयस्कांमध्ये हायपोटेंशन कायम राहणे. तर लहान मुलांमध्ये मानसिक भ्रम आणि हायपोटेंशन दिसणे.
उपचार कसा ?
काही जणांना लोपिनाव्हिर/रिटोनाव्हिर देण्यात येते. हायपॉक्जिया, हायपोटेंशन, मधुमेह, फुफ्फुसांची समस्या असणाऱ्या 60 वर्षांपेक्षा अधिकच्या रुग्णांना हे औषध दिले जाते.
वृद्धांनी घ्यावी काळजी –
वृद्धांनी घराच्या बाहेर पडू नये. तसेच कोणाला भेटू नये. वारंवार हात धुवावेत व खोकताना-शिंकताना रुमालाचा वापर करावा. थोडाफार व्यायाम करावा व पोष्टिक आहार घ्यावा. डोळे, गुडघ्याचे ऑपरेशन करू नये व कोणतीही लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
वृद्धांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. आजारी लोकांपासून लांब राहावे व डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये. कुटुंबातील सदस्यांनी वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी.