कोरोना : अमेरिका, ऑस्ट्रेलियात घरगुती हिंसाचारात वाढ

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक शहर लॉकडाऊन करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीमध्ये लोक आपआपल्या घरात कैद आहेत. मात्र यासोबतच घरगुती हिंसाचारात देखील वाढ झाल्याचे समोर येत आहे. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासह यूरोपियन देशात हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये अशा प्रकरणांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेत देखील स्थानिक प्रशासनाला याबाबत विशेष चेतावणी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया घरगुती हिंसाचारासंबंधी तक्रारीमध्ये वाढ झाली असून, यासाठी सरकारने 15 कोटी डॉलरचा निधी देखील जारी केला आहे.

अमेरिकन डीसी सेफ नावाच्या संस्थेनुसार, मागील दोन आठवड्यात घरगुती हिंसाचारासंबंधी येणाऱ्या फोनमध्ये वाढ झाली आहे. अमेरिकेतील 20 राज्यांच्या सॅनिटर्सनी ट्रम्प प्रशासनाला घरगुती हिंसाचार पीडितांची मदत करणाऱ्या संस्थांना लॉकडाऊनमध्ये सुट देण्याची मागणी केली आहे.

अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, चार पैकी 1 महिला आणि 7 पैकी एका पुरूषाला आपल्या जोडीदाराकडून गंभीर शारीरिक हिंसेचा सामना करावा लागत आहे. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि शिकागोमध्ये स्थानिक हेल्प लाईन मदतसाठी येणाऱ्या फोनची संख्या वाढली आहे.

यूरोपमध्ये देखील देखील घरगुती हिंसा पीडितांची मदत करणाऱ्या संस्थांनी देखील याबाबत इशारा दिला आहे. महिला आणि लहान मुलांच्या विरोधात लैंगिक हिंसाचार वाढल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment