फ्रान्समध्ये कोरोनाच्या प्रसारासाठी ‘चर्च’ ठरले केंद्र

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र धार्मिक ठिकाणी जमलेले लोकच जगभरात कोरोना पसरवण्यास कारणीभूत ठरत आहेत.

फ्रान्सच्या म्यूलहाउस येथील चर्चमध्ये दरवर्षीप्रमाणे एक आठवडा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 18 फेब्रुवारीला झालेल्या सामुहिक प्रार्थनेमध्ये जगभरातून हजारो लोक उपस्थित राहिली होती. यानंतर ही लोक जगभरातील वेगवेगळ्या कोपऱ्यात गेले व त्यामुळे कोरोना व्हायरस जगभरात थैमान घातले आहे.

हे चर्चच फ्रान्समध्ये कोरोनाच्या संसर्गाचे केंद्र ठरले आहे. यामुळे 2500 लोक संक्रमित झाले आहेत. फ्रान्सच्या नॅशनल पब्लिक हेल्थच्या डॉ. मिशेल वर्ने यांनी सांगितले की, जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा असे वाटले की आमच्या समोर एखादा टाईम बॉम्बच ठेवला आहे. तोच टाईम बॉम्ब आता थैमान घालत असून आम्ही असहाय्य आहोत.

धार्मिक आयोजनानंतर जर्मनीने फ्रान्सशी लागून असलेली आपली सीमा बंद केली आहे. यासाठी चर्च हेच मोठे कारण आहे. प्रार्थनेमध्ये आलेल्या 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्या, चर्चेच लोक सांगत आहेत.

Leave a Comment