आता ऑनलाईन बुक करा कोरोना टेस्टिंग

जगभरात सध्या कोरोना चाचणी किटची मागणी वाढली आहे. याच पार्श्वभुमीवर प्रॅक्टोने (Practo) कोव्हिड-19 च्या चाचणीसाठी ऑनलाईन बुकिंग घेण्यास सुरूवात केली आहे. कंपनीने यासाठी थायरोकेअरसोबत भागीदारी केली आहे.

प्रॅक्टोने सांगितले की, थायरोकेअरसोबत मिळून कोव्हिड 19 ची चाचणी केली जात आहे. सरकारने देखील यास परवानगी दिली आहे. यासोबत इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चद्वारे देखील परवानगी मिळाली आहे.

प्रॅक्टोने सांगितले की, सध्या मुंबईत नागरिकांसाठी चाचणी उपलब्ध असून, लवकरच संपुर्ण देशात चाचणी सुविधा उपलब्ध केली जाईल. यासाठी डॉक्टरांच्या प्रेसक्रिप्शनची गरज असेल व टेस्ट रिक्विजिशन फॉर्म भरावा लागेल. चाचणी दरम्यान ओळखपत्राची देखील गरज असेल.

या चाचणीसाठी प्रॅक्टोच्या वेबसाईटवर 4,500 रुपयांमध्ये बुकिंग करता येईल. बुकिंगनंतर त्या व्यक्तीच्या घरी सँपल गोळा करण्यासाठी कंपनीकडून प्रतिनिधी येईल.

कंपनीने सांगितले की, सँपल गोळा करण्यासाठी आलेले प्रतिनिधी सर्व गाइडलाईन्सचे पालन करतील. चाचणीसाठी स्वॅब व्हायरल ट्रांसपोर्ट मीडियमद्वारे गोळा केले जातील. याला कोल्ड चेनद्वारे थायरोकेअर लॅबोरेटरीमध्ये पाठवले जाईल. या चाचणीचा रिझल्ट देखील वेबसाईटवरच 24 ते 48 तासात पाहण्यास मिळेल.

Leave a Comment