बेल्जियम मध्ये मांजराचा करोनामुळे मृत्यू


फोटो सायन्स अलर्ट
जगभरात माणसांचा काळ बनलेला करोना आता प्राण्यांनाही त्याच्या कवेत घेऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. हॉंगकॉंगमध्ये एका पाळीव कुत्र्याला करोनाची लागण होऊन त्याचा नंतर मृत्यू झाल्याची घटना घडल्यावर आता बेल्जियम मध्ये एका पाळीव मांजराचे प्राण करोनाने घेतले आहेत.

या मांजराच्या मालकीणीची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तिच्यामुळे या मांजरीला संसर्ग झाला असावा असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मांजरीची टेस्ट केली गेली तेव्हा ती ही पॉझीटीव्ह आली आणि त्यात मांजरी मरण पावली. डॉक्टर्स सातत्याने पाळीव प्राण्यांना दूर ठेवा अश्या सूचना देत आहेत. विशेषतः पाळीव प्राण्यांच्या बाबतीत ही काळजी अवश्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

यापूर्वी कुत्र्याला झालेला करोना संसर्ग सुद्धा त्याच्या मालकिणीमुळेच झाला होता. त्यावेळी या कुत्र्याला आयसोलेशन मध्ये ठेऊन त्याच्यावर उपचार केले गेले आणि टेस्ट निगेटिव्ह आल्यावर त्याला सोडले गेले पण नंतर तो मरण पावला. जागतिक आरोग्य संघटनेने करोना मुळे संक्रमित झालेला हा पहिलाच कुत्रा असल्याचे जाहीर केले होते.

Leave a Comment