करोनावर विजयाचा जल्लोष, चीनी, वटवाघुळांवर मारताहेत ताव


फोटो सौजन्य पत्रिका
चीनच्या वुहान वेट मार्केटमधून जगभर वेगाने पसरलेल्या कोविड १९ ने जगभरात ३४ हजाराहून अधिक लोकांचे प्राण घेतले असताना चीन मध्ये करोनाचा संसर्ग थांबल्याचा आनंद किंवा करोनावर विजय मिळविल्याचा जल्लोष चीनी जनता साजरा करत असून येथील वेट मार्केट पुन्हा जोमाने सुरु झाली आहेत. या मार्केट मध्ये पुन्हा एकदा जिवंत प्राणी पिंजऱ्यातून मांडले गेले असून त्याची जोरदार विक्री होत आहे. विशेष म्हणजे ज्या वटवाघुळांच्या मुळे हा विषाणू पसरला त्या वटवाघुळांवर चीनी पुन्हा ताव मारताना दिसत आहेत.

वुहान आणि देशाच्या अन्य भागातील वेट मार्केट पुन्हा एकदा कुत्री, मांजरे, वटवाघुळे, विंचू, बदके, ससे यांनी गजबजली असून हे प्राणी उघड्यावर मारून विकले जात आहेत. चीनी जनता करोना चीन मधून पसरला हे मान्य करायला तयार नाही. त्याच्या मते हा विदेशी आजार आहे आणि सरकारनेही जनतेला वेट मार्केट मधून खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे सांगितले जात आहे.

तीन महिन्यापूर्वी वुहानच्या याच बाजारातून करोना पसरला होता मात्र चीन मध्ये आता लॉकडाऊन हटविला गेल्यावर जनता पुन्हा या बाजारात खरेदीसाठी गर्दी करू लागली आहे. या बाजारांचे फोटो सोशल मिडियावर येऊ नयेत यासाठी सरकारने बाजाराबाहेर सुरक्षा दले नेमली असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment