व्हिडीओ : लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्यांचा पोलिसांकडून पाहुणचार

सरकारने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याठी 14 एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस देखील नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करत आहेत. मात्र जे बाहेर फिरत आहेत, अशांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद मिळत आहे.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडीओमध्ये पोलीस बाहेर फिरणाऱ्यांना शिक्षा करत नसून, चक्क त्यांची आरती ओवाळत आहेत.

विशेष म्हणजे या व्हिडीओला एका व्यक्तीने विजयपथ चित्रपटातील ‘आइए आपका इंतजार था’ हे गाणे जोडले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला देखील हसू येईल.

या व्हिडीओला एका ट्विटर युजरने शेअर केले असून, आतापर्यंत या व्हिडीओला 4 लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिले आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराच्या बाहेर पडणाऱ्यांना पोलीस शिक्षा करत असून, याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या शिक्षेतून पोलीस एकच संदेश देत आहेत की स्वतःच्या सुरक्षेसाठी कृपया बाहेर पडू नका व कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करा.

Leave a Comment