कोरोनाग्रस्तांसाठी गौतम गंभीरची 1 कोटींची मदत

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हायरसशी लढण्यासाठी सर्व क्षेत्रातील सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी दुसऱ्यांदा मदतीचा हात पुढे केला आहे.

गंभीर यांनी एमपी लोकल एरिया स्कीमकडून पंतप्रधान केअर्स फंडमध्ये 1 कोटी रुपये दान केले आहेत. गौतम गंभीर म्हणाले की, ही कोव्हिड-19 महामारीशी लढण्याची व देशाची मदत करण्यासाठी पुढे येण्याची वेळ आहे. आपल्या खासदार निधीमधून 1 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय एक महिन्याचा आपले वेतन देखील देणार आहे. या कामात सर्वांनीच मदत करावी.

गौतम गंभीर यांनी याआधी देखील दिल्ली सरकारला कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी व उपकरणांसाठी 50 लाख रुपये दिले होते. याशिवाय आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून भागातील 2000 गरीबांना पॅकेट जेवण देखील वितरित केले होते.

गौतम गंभीर यांच्या व्यतिरिक्त क्रिकेट जगतातून अनेक खेळाडूंनी मदतीचा हात पुढे केला आहे. बीसीसीआयने 51 कोटी रुपये, सचिन तेंडूलकर 50 लाख रुपये, सुरेश रैना 52 लाख रुपये, अजिंक्य रहाणे 10 लाख रुपये आणि महेंद्रसिंह धोनीने पुण्याला 1 लाख रुपयांची मदत केली आहे.

Leave a Comment