न्यूयॉर्क सरकारचा कोरोनाला दूर पळविण्यासाठी अजब सल्ला


कोरोना व्हायरसमुळे जगभरातील बहुतांश देशांमध्ये लॉकडाउनसारखी परिस्थिती आहे. लॉकडाउनमुळे बहुतेक देशांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कंपन्या, कार्यालये बंद असल्यामुळे सर्वचजण घरामध्ये आहेत. ज्यांना शक्य आहे, ते घरामधूनच काम करत आहेत. पण असा पर्याय ज्यांच्याकडे उपलब्ध नाही, त्यांना लॉकडाऊनचे पहिले दोन-तीन दिवस संपल्यानंतर आता घरी बसून कंटाळा येऊ लागला आहे. वेळेचा सदुपयोग कसा करता येईल, यासाठी लोकांना टीव्हीवरुन काही कार्यक्रमही दाखवले जात आहेत.

पण या सगळ्यात वेगळा उपाय अमेरिकेतील न्यूयॉर्क सरकारने शोधून काढला आहे. नागरिकांना त्यांनी हस्तमैथुन करण्याचा सल्ला दिला आहे. संपूर्ण जगावर कोरोनाच्या संकटाचा परिणाम झाला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोक वेगवेगळे कल्पक मार्ग शोधून काढत आहेत. कुटुंबासोबत असल्यामुळे काही जण आनंदी आहेत तर काही जण या सुट्टीमध्ये आपले छंद जोपासत आहेत.


लैंगिक आरोग्याचा अभ्यास करणाऱ्या एका स्टडीने या कठिण काळात तणाव कमी करण्यासाठी एक उपाय सुचवला आहे. चुंबनामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. दुसरे कोणी नाही, तर तुम्हीच तुमचे सुरक्षित सेक्स पार्टनर आहात. सेक्स टॉइज आणि हात साबणाने स्वच्छ धुवत असाल तर, हस्तमैथुनामुळे कोरोनाचा फैलाव होणार नसल्याचे अधिकृत ट्विटर अकाउंटवर न्यूयॉर्कच्या आरोग्य खात्याने म्हटले आहे.

मानसिक आणि शारीरिक फायदा हस्तमैथुनामुळे होत असल्याचे आतापर्यंत वेगवेगळया लैंगिक अभ्यास अहवालातून समोर आले आहे. तणाव हस्तमैथुनामुळे कमी होतो, चांगली झोप लागते, लक्ष केंद्रीत होण्याबरोबरच लैंगिक क्षमता वाढत असल्याचे काही लैंगिक अभ्यास अहवालातून समोर आले आहे.

Leave a Comment