लष्कर दाखल झाल्याची अफवा पसरवणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या


मुंबई : देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहिर करण्यात आला आहे. सर्वच राज्यांच्या सीमा या खबरदारी म्हणून बंद करण्यात आल्या आहे. अशा परिस्थितीत काही समाजकंटक अफवा पसरवण्याचे काम करत आहे. सोशल मीडियावर ‘लष्कर दाखल झाले आहे’ अशी अफवा पसरवणाऱ्या मुंबईतील पठाणवाडीमधील तरुणाला अटक करण्यात आली आहे.

डॉक्टर्स आणि पोलीस यंत्रणा कोरोना व्हायरस रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून आपले कर्तृत्व पार पाडत आहे. परंतु, अपुऱ्या माहितीच्या आधारे काही जण अफवा पसरवण्याचे काम करत आहे. मुंबईतील पठाणवाडी परिसरात सोहील सलीम पंजाबी नावाच्या तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर या तरुणाने एक व्हिडिओ शेअर केला होता. पोलिसांची जागा आता लष्कराने घेतली असल्याचे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले होते. नळ बाजार, भिंडी बाजार, डोंगरी, मदनपुरा, काळा पाणी आणि सात रास्ता परिसरात परिस्थितीत हाताबाहेर गेली असून लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. लोकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज आणि गोळीबार करण्यात आला, असे या तरुणाने व्हिडिओमध्ये सांगितले होते. परंतु, अशी कोणतीही परिस्थितीत या परिसरात निर्माण झाली नव्हती. या व्हिडिओच्या आधारे सोहील सलीम पंजाबी या तरुणाला अफवा पसरवल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Comment