देशातील 1100 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण, 27 मृत्युमुखी


नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वेगाने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनामुळे देशात गेल्या 24 तासात सहा जणांना आपला प्राण गमवावे लागले आहे. तर 106 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात एकूण 1100 हून जास्त जणांना कोरोनाची लागण झाली असून आजमितीस देशात 1136 कोरोनाग्रस्त आहेत. तर महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 215 वर पोहोचला आहे.

भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्यास पसरण्यास सुरुवात झाली असून शनिवारीच देशात कोरोनाग्रस्ताचा आकडा 1000 पार झालेला होता. सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यात आढळून आले आहे. आत्तापर्यंत देशात 27 राज्यात कोरोना व्हायरस पसरला आहे. देशात कोरोनामुळे एकूण 27 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 90 जण कोरोना होऊन देखील बरे झाले आहेत.

केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. पण दिल्लीतील एका बसस्टँडवर शनिवारी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. बिहार, उत्तर प्रदेशमधून आलेले हजारो कामगार याठिकाणी घरी जाण्यासाठी आले होते. परिमाणी सोशल डिस्टन्सिंग कशी पाळली जाईल, असा प्रश्न विचारला जात आहे.

Leave a Comment