पाकमधील अल्पसंख्यांक हिंदूंसोबत भेदभाव, कोरोनाच्या आपत्तीत नाकारले रेशन

Discrimination against minority Hindus in Pakistan

Discrimination against minority Hindus in Pakistan


इस्‍लामाबाद : जगभरातील तब्बल 180 देशांमध्ये कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. कोरोनाने आपल्या शेजारील देशात म्हणजेच पाकिस्तानमध्ये देखील धुमाकूळ घातला आहे. त्यातच नवे पाकिस्तान बनवण्याचे आश्वासन पंतप्रधान इमरान खान यांनी केले होते, पण हाच देश सध्या कोरोनाच्या संकटात आहे. याच देशात सध्या इमरान खान सरकार लोकांना फुकटात रेशन देत आहे. पण तेथील अल्पसंख्यांक हिंदूना राशन मिळेनासे झाले आहे. सिंध प्रांतातील कराची शहरातील ही घटना आहे. कोरोनाची भीती सिंध प्रांतात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर येथील मुस्लिमांना रेशन व आवश्यक वस्तू दिल्या जात आहेत, पण तेथील हिंदूंना मात्र देण्यास नकार दिला जात आहे.

हिंदूंना सांगण्यात आले आहे की, हे राशन फक्त मुस्लिमांसाठी असल्यामुळे तेथील हिंदूंमध्ये संतापाचे वातावरण आहे. पाकमधील लॉकडाऊन लक्षात घेता दररोज कामगार आणि कामगारांना स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाच्या वतीने राशन देण्याचे आदेश सिंध सरकारने दिले आहेत. मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने हिंदूंना तुम्ही राशन मिळण्यास पात्र नसल्याचे सांगण्यात आले.

हिंदूंना प्रशासन सांगत आहे की हे राशन फक्त मुस्लिमांसाठी आले आहे. त्याचबरोबर तब्बल 3 हजार लोक एकाचवेळी राशन घेण्यासाठी जमतात, यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. तसेच लियारी, सचल घोथ, कराचीच्या इतर भागांसह संपूर्ण सिंधमध्ये हिंदूंना राशन नाकारले जात आहे. अल्पसंख्यांक समुदाय हा भयंकर खाद्य पेचप्रसंगातून जात आहे असा इशारा राजकीय कार्यकर्ते डॉ. अमजद अयूब मिर्झा यांनी दिला आहे.

कोरोना संसर्ग झालेल्या पाकिस्तानमधील लोकांची संख्या 1500च्या पुढे गेली आहे. कोरोना विषाणूचा कहर पाकिस्तानमध्ये कायम आहे. आतापर्यंत 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक प्रभावित प्रांतांमध्ये पंजाब 593 आणि सिंध 502 घटनांचा समावेश आहे. या आपत्तीच्या वेळीही पाकिस्तानी प्रशासन हिंदूंशी भेदभाव करण्यापासून थांबत नाही आहे. दुसरीकडे इमरान खान सरकारने कोट्यावधी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. यापूर्वी सत्तेत येताना इम्रान यांनी अल्पसंख्यांकांशी कोणताही भेदभाव न करता पाकिस्तानला एक रियासत बनवल्याचे, आश्वासन लोकांना दिले होते. मात्र आता पाकिस्तानमधील हिंदूंना या संकटाच्या घटनेत राशन दिले जात नाही.

Leave a Comment