ऑटोमोबाईल कंपन्या करणार वेंटिलेटर्सची निर्मिती, सरकारचा निर्णय

कोरोना व्हायरस माहामारीचा सामना करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाने ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्सला वेंटिलेटर्स बनविण्यास सांगितले आहे.

आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, ऑटोमोबाईल कंपन्यांनी या बाबत काम करण्यास सुरूवात केली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड पुढील 2 महिन्यात स्थानिक उत्पादकांसोबत मिळून 30 हजार वेंटिलेटर्स बनवेल. सध्या देशातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये 14 हजारांपेक्षा अधिक वेटिंलेटर्स कोरोनाग्रस्तांसाठी उपलब्ध आहेत.

नोएडा येथील एग्वा हेल्थकेअर एका महिन्यात 10 हजार वेंटिलेटर्स बनवणार आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात या वेंटिलेटर्सचा सप्लाय सुरू होईल. डीआरडीओ पुढील आठवड्यापासून दररोज 20 हजार एन99 मास्क बनवेल. सध्या देशभरातील हॉस्पिटलमध्ये 11 लाख 95 हजार एन95 मास्क आहेत. दोन स्थानिक उत्पादक देखील दररोज 50 हजार एन95 मास्क बनवणार आहे.

रेड क्रॉसने देखील 10 हजार पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट दान केले आहेत. देशातील दिग्गज कार कंपनी मारुती सुझुकीने देखील वेंटिलेटर, मास्क आणि अन्य उपकरणांसाठी काही कंपन्यांशी करार केला आहे.

Leave a Comment