वर्षभरात जगाची 70 टक्के लोकसंख्या सापडू शकते कोरोनाच्या विळख्यात

जागतिक महामारी घोषित करण्यात आलेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील 190 पेक्षा अधिक देशात थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र विशेषज्ञांच्या मते पुढील एक वर्षात जगातील 70 टक्के लोकसंख्या या व्हायरसच्या विळख्यात सापडू शकते. याबाबत हॉवर्ड युनिवर्सिटीचे महामारी आजारांचे विशेषज्ञ मार्क लिपसिच यांनी माहिती दिली आहे.

मार्क लिपसिच यांच्यानुसार, 40 ते 70 टक्के लोक या व्हायरसच्या विळख्यात सापडू शकतात. तसेच 1 टक्के लोकांमध्ये याची लक्षण दिसतील.
प्लेग आणि इन्फ्लुएंजा सारख्या महामारीमुळे अनेकदा लाखो लोकांचे प्राण गेले आहेत. मागील 3 दशकात जवळपास 40 नवीन विषाणू समोर आले आहेत.

सर्वसाधारणपणे मागसलेले आणि गरीब देशांमध्ये संक्रमित आजाराचा प्रसार सर्वाधिक होतो, असे मानले जाते. मात्र कोरोना व्हायरसमुळे स्पष्ट झाले आहे की विकसित देश देखील अशा व्हायरसपासून लांब नाहीत. मानव विकास आणि संक्रमित आजारांचा संबंध आहे. विकासासठी नवीन तंत्रज्ञान, झाडे कापणे, नवीन बांध, लोकसंख्या वाढ, शहरीकरण हे सर्व संक्रमित आजारांचा प्रसार होण्यास कारणीभूत आहे.

Leave a Comment