धुम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका

जर तुम्हाला धुम्रपान करण्याची सवय असेल अथवा टीबीचा आजार असेल, तर सावध राहण्याची अधिक गरज आहे. कारण धुम्रपान आणि टीबीच्या रुग्णांचे फुफ्फुस सामान्य लोकांच्या तुलनेत अधिक कमकुवत असते. त्यामुळे या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग लवकर होऊ शकतो.

धुम्रपान करणाऱ्यांना कोव्हिड-19 चा धोका अधिक असतो. कोरोनाचा व्हायरस चेहरा, नाक आणि डोळ्यांद्वारे शरीरात प्रवेश करतो. धुम्रपान करण्यासाठी सिगरेट बोटांपासून चेहऱ्याच्या संपर्कात येते. याशिवाय अशा लोकांचे फुफ्फुस देखील कमकूवत असते, त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.

टीबीच्या रुग्णांना देखील या व्हायरसचा संसर्ग लवकर होऊ शकतो. हा व्हायरस फुफ्फुसांवर हल्ला करतो. ज्यामुळे श्वास घेण्यास अडचण येते व रुग्णाचा मृत्यू होतो.

आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार किडनी, लिव्हर, ह्रदय, मधुमेह, हॅपिटाइटिस बी आणि सी, टीबी आणि सीओपीडीसीची समस्या असणारे लवकर कोरोना व्हायरसच्या संपर्कात येतात. यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे घरात थांबून सुरक्षित राहणे.

Leave a Comment