मार्क आणि प्रीसिला झुकेरबर्ग करोनासाठी देणार २५० लक्ष डॉलर्स


फोटो सौजन्य पत्रिका
करोनाशी लढाई साठी जगात क्रीडा, उद्योग क्षेत्राकडून देणग्या आणि दान मोठ्या प्रमाणावर जमा होऊ लागले आहे. फेसबुकचा सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि त्याची पत्नी प्रीसिला यांनी त्याच्या फौंडेशनतर्फे याच कामासाठी २५० लक्ष डॉलर्स देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या संस्थेचे नाव चॅन झुकेरबर्ग इनिशिएटीव्ह आहे. ही मदत कोविड १९ च्या उपचार खर्चासाठी वापरली जाणार आहे.

या संदर्भात प्रीसिला म्हणाली करोनावरील औषध तयार करण्यासाठी ज्या संघटना काम करत आहेत त्यांना मदत करण्याची इच्छा आहे. सध्या कोविड १९ साठी अनेक औषधांच्या चाचण्या सुरु आहेत त्यातले कुठले औषध अधिक परिणामकारक आहे हे लवकरच कळेल.

कोविड १९ चा फैलाव जगातील २०१ देशात झाला असून त्यात ३२ हजारावर मृत्यू झाले आहेत.

Leave a Comment