महिंद्रा व्हेंटिलेटरनंतर बनवताहेत मेडिकल वायझर


देशाला करोनाशी लढाईत मदतीचा हात देताना ऑटो कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने व्हेंटिलेटरचे उत्पादन सुरु केले आहेच पण त्या पाठोपाठ ३० मार्च पासून कंपनी मेडिकल वायझर( medical visor) बनवीत आहे. याचा उपयोग प्रामुख्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना होणार आहे.

व्हेंटिलेटर बनविण्याची घोषणा केल्यावर कंपनीने अवघ्या दोन दिवसात त्याचा प्रोटोटाईप बनविला असून त्याची किंमत ७५०० रुपये आहे. आता कंपनीने मेडिकल वायझर बनविण्यास सुरवात केली असून सुरवातीला त्याची ५०० युनिट तयार केली जात आहेत. नंतर आवश्यकतेनुसार त्याचे उत्पादन वाढविले जाणार आहे. तयार झालेली मेडिकल वायझर्स डॉक्टर, नर्स आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना पोहोचविली जाणार आहेत. वायझरचा वापर केल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाचा धोका रहात नाही आणि त्यामुळे आजारी रुग्णांवर ते सहज विनाधोका उपचार करू शकतात असे सांगितले जात आहे.

Leave a Comment