नवी दिल्ली – जगभरात कोरोना व्हायरसचा कहर वाढत असून या व्हायरसमुळे जगभरात मृत्यू झालेल्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. त्यातच आता कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तिंच्या यादीत स्पेनच्या राजघराण्यातील व्यक्तिचाही समावेश झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे स्पेनची राजकन्या मारिया तेरेसा यांचा मृत्यू झाला. त्या ८६ वर्षांच्या होत्या. मारिया यांचे बंधु प्रिन्स सिक्सटो एनरिक दी बॉरबोन यांनी फेसबुकवरून ही माहिती दिली.