विश्वास नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये; आता चुकीला माफी नाही


नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा वाढता फैलाव थांबवण्यासाठी राज्यात लॉकडाऊन केले आहे. पण या आजाराचे नागरिकांना गांभीर्य काही लक्षात येत नाही. नागरिक नियमांचे उल्लंघन करून विनाकारण बाहेर पडत आहेत. पोलिसांनी यावर कडक कारवाई केल्याचे अनेक व्हिडिओ आणि बातम्या आपण सोशल मीडियावर पाहिल्या. पण यातून आपण काहीच धडा घेतल्याचे चित्र सध्यातरी दिसत नाही.

अजूनही लोक घराबाहेर हिंडण्यासाठी निघत आहेत. सोशल डिस्टंसिंगच्या नियमाला तर पायदळी तुडवले जात आहे. पण अशावर आता पोलिसांनीही कारवाईला आणखी धार आणली आहे. कारण नसताना बाहेर फिरणाऱ्या लोकांच्या गाड्या आता तीन महिन्यांसाठी जप्त होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नाशिक पोलीस आयुक्तांनी असे आदेशच दिले आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील 100 हॉटेलला केवळ फूड पार्सल सेवा सुरू करण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आहे.

दरम्यान, एकीकडे नियमांचे लोक पालन करत नाहीत तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आणखी नवे कोरोनाचे 05 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर नागपुरात एका रुग्णाच्या टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आता राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 159 वर पोहोचली आहे.

मुंबईतील भाभा आणि कस्तुरबा रुग्णालयात शुक्रवारी दिवसभरात 9 रुग्णांची नोंद झाली. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 91 झाली आहे. तर आतापर्यंत मुंबईत 05 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत संशयित रुग्णांसह 209 कॉरोनाग्रस्त दाखल आहेत. एकूण 17 नवीन रुग्ण शुक्रवारी दिवसभरात आढळले होते. सांगलीमध्ये नवे 12 रुग्ण तर नागपूरमध्ये 5 रुग्ण आढळले असून राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्याही तब्बल 159 वर पोहोचली आहे. नवी मुंबईत दीड वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे.

Leave a Comment