कोरोना : अमेरिका भारतासह 64 देशांना करणार 13 अब्ज रुपयांची मदत

अमेरिके कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत चालली असून, या देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाखांच्या पुढे गेला आहे. जागतिक महामारीशी लढणाऱ्या अमेरिकेने आता दुसऱ्या देशांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे व आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

अमेरिकेने कोरोना व्हायरसमुळे प्रभावित झालेल्या भारतासह 64 देशांच्या मदतीसाठी 13 अब्ज रुपयांची घोषणा केली आहे. यात भारताला जवळपास 20 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. याशिवाय श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांना देखील अमेरिका मदत करणार आहे.

सध्याच्या स्थितीला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक पॅकेजची देखील घोषणा करण्यात आली आहे. आहे. कोरोनाशी लढण्यासाठी 2 ट्रिलियन डॉलरसच्या मदत निधीला संसद व डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मंजूरी मिळाली आहे. अमेरिका या निधीचा वापर आपल्या देशातील नागरिक व आरोग्य व्यवस्थेच्या सुधारणेसाठी करेल.

Leave a Comment