कोरोना व्हायरस रोखण्यासाठी या देशांनी वापरले आधुनिक तंत्रज्ञान

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी विविध देश पावले उचलत आहेत. अनेक देशांनी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली आहे व खास गोष्ट म्हणजे याद्वारे त्यांना फायदा देखील झाला आहे.

Image Credited – cnbc

हाँगकाँग –

हाँगकाँगच्या सरकारने कोरोना व्हायरसवर रोख लावण्यासाठी खात तंत्रज्ञानाच्या रिस्टबँडचा वापर केला. हे बँड स्मार्टफोन अ‍ॅपशी कनेक्ट असते. हे अ‍ॅप सतत लोकांच्या लोकेशनला ट्रॅक करते व क्षणाक्षणाची माहिती अधिकाऱ्यांना देते.

Image Credited – CNBC

दक्षिण कोरिया –

दक्षिण कोरियाने कोरोना व्हायरसला ट्रॅक करण्यासाठी सीसीटिव्हीचा उपयोग घेतला. याशिवाय सरकारने एक खास टूल देखील लाँच केले होते. सरकार या टूलद्वारे लोकांवर लक्ष ठेवत आहे.

Image Credited – OpenGov Asia

सिंगापूर –

सिंगापूरच्या सरकारने कोरोना व्हायरसच्या रुग्णांना ट्रॅक करण्यासाठी TraceTogether नावाचे अ‍ॅप लाँच केले आहे. हे अ‍ॅप ब्लूटूथच्या सिग्नलवर काम करते. रुग्ण दिवसाला किती जणांना भेटला याची माहिती हे अ‍ॅप रुग्णांना देते.

Image Creedited – Amarujala

चीन –

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी चीनने सर्वात प्रथम कलर कोडिंग तंत्रज्ञानाचा वापर केला. या तंत्रज्ञानासाठी अलीबाबा आणि टेनसेंट यांनी भागिदारी केली आहे. हे सिस्टम स्मार्टफोन अ‍ॅपच्या रुपात काम करते व यात युजर्सला त्याच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीनुसार हिरवी, पिवळी आणि लाल रंगाचे क्यूआर कोड दिले जाते.

या सिस्टमसाठी चीन सरकारने चेकप्वाइंट्स बनवले आहेत. जेथे लोकांचे चेकिंग होते. कलर कोडनुसार लोकांना सार्वजनिक ठिकाणी जायचे की घरात क्वारंटाईनमध्ये राहायचे हे सांगितले जाते.

Leave a Comment