सावधान ! कोरोनाच्या मेसेजमुळे होऊ शकते मोठे नुकसान

कोरोना व्हायरस संदर्भात लोकांपर्यंत योग्य माहिती पोहचण्यासाठी सरकारतर्फे हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेले आहेत. सरकारने व्हॉट्सअ‍ॅपवर देखील हेल्पलाईन सुरू केली आहे. मात्र असे असले तरी व्हायरससंदर्भात अनेक अफवा पसरवल्या जात आहेत.

कोरोना व्हायरसच्या संदर्भातील अनेक फेक मेसेज व्हायरल होत आहेत. सोबतच अशा मेसेजद्वारे हॅकर्स तुम्हाला निशाणा बनवू शकतात. तुमच्या मोबाईलवर देखील कोरोनापासून बचावासंदर्भात एखादा मेसेज आला असल्यास त्यातील लिंकवर क्लि करू नका. अन्यथा हॅकर्स तुमच्या खात्यातील मोठी रक्कम उडवू शकतात.

Image Credited – Amarujala

कोरोनापासून वाचण्याच्या मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक केल्याने आतापर्यंत अनेकजणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. हॅकर्स कोरोनासंदर्भात सुचना आणि औषधांची माहित पाठवतात व सोबत एक लिंक देतात. या लिंकवर क्लिक केल्यानंतर युजरची खाजगी माहिती हॅकर्सपर्यंत पोहचते. त्यामुळे अशा कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

कोरोनाची माहिती देणाऱ्या अनेक बनावट वेबसाईट देखील आहेत. त्यामुळे या वेबसाईटवर जाणे टाळावे. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

Leave a Comment