कोरोना : भारताचे ‘इटली’ बनत चालले आहे हे शहर

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन केले आहे. या व्हायरसपासून बचावासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. असे असले तरी राजस्थानमधील भीलवाडामधील परिस्थिती अत्यंत खराब आहे. या शहराला भारताचे इटली म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण येथील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

राजस्थानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 45 झाली आहे. मात्र यातील 21 रुग्ण हे एकट्या भीलवाडा येथील आहे. किल्ले आणि महालांसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात राजस्थानमधील कोरोनाग्रस्ताचा पहिला मृत्यू झाला.

या शहरात कोरोना तिसऱ्या टप्प्यात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी देखील संपुर्ण जिल्ह्याची तपासणी झाल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यातील स्थिती अतिसंवेदनशील झाली असल्याने, नागरिक घाबरले आहे व जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जात आहेत. 11 हजार लोक कोरोना संशयित आहेत, ज्यातील 6445 जण होम-आयसोलेशन आहेत.

भीलवाडा येथील खाजगी हॉस्पिटल बांगड येथूनच कोरोनाग्रस्त अधिक समोर आले आहेत. हॉस्पिटलमध्ये 86 बेड्सची सुविधा आहे. मात्र रुग्ण अधिक प्रमाणात आल्याने इंफेक्शन पसरले. हॉस्पिटलच्या 1 किमी भागाला सील करण्यात आले आहे. येथे कलम 144 देखील लागू करण्यात आले आहे.

येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील हॉटेल, हॉस्टेल आणि रिसॉर्टच्या इमारतींना सरकारने क्वारंटाईनमध्ये बदलण्याचे काम सुरू केले आहे. आरोग्य विभाग प्रत्येकाच्या घरी जाऊन परदेशातून कोणी आलेले तर नाही, याची तपासणी करत आहे.

Leave a Comment