कोरोना : रेल्वेचे डब्बेच झाले आयसोलेशन वॉर्ड

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी प्रत्येकजण मदत करत आहेत. आता रेल्वेने देखील कोरोनाशी लढण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रेल्वेने आपल्या 24 डब्ब्यांच्या रेल्वेला आयसोलेशन वॉर्डमध्ये बदलले आहे.

मागील अनेक दिवसांपासून कोरोनाग्रस्तांना ठेवण्यासाठी रेल्वेच्या डब्ब्यांना आयसोलेशन सेंटरमध्ये बदलावे अशी मागणी करण्यात येत होती. अखेर रेल्वेने आयसोलेशन वॉर्डमध्ये बदलम्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वमंत्री पीयूष गोयल यांनी देखील ट्विट करत या संदर्भात माहिती दिली.

सध्याच्या डब्ब्यांना आणीबाणीच्या स्थितीमध्ये उपयोगासाठी वापरण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सध्या उत्तर रेल्वेच्या जगाधरी वर्कशॉपमध्ये स्लीपर कोचला आयसोलेशन वॉर्डमध्ये बदलण्याचे काम सुरू आहे.

प्रत्येक डब्ब्यात 10 आयसोलेशन वॉर्ड असतील. याशिवाय यात टॉयलेट पॅनला बंद करून दोन शौचालयांना बाथरूममध्ये बदलण्यात येईल. याशिवाय हात धुणे व अंघोळीची सुविधा, प्रत्येक बाथरूममध्ये एक बादली आणि मग आणि वीज उपलब्ध असेल.

Leave a Comment