या चाचणी किटद्वारे 5 मिनिटात होणार कोरोनाची पुष्टी

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, यावर लस शोधण्याचे काम वैज्ञानिक करत आहे. सध्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे समजण्यास 24 तास लागतात. मात्र आता अवघ्या 5 मिनिटात याची माहिती मिळणार आहे

एबॉट (Abbot) नावाच्या एका अमेरिकन लॅबने एक पोर्टेबल चाचणी किट तयार केले आहे. ज्याच्या मदतीने अवघ्या 5 मिनिटात चाचणी करून रिझल्टबाबत माहिती मिळेल. याबाबतची माहिती लॅबने स्वतः ट्विटरवर दिली.

या किटला अमेरिकेच्या फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने देखील मंजूरी दिली आहे. पुढील आठवड्यापासून हे किट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होतील.

एबॉटनुसार, कोरोना व्हायरसच्या या चाचणी किटचा आकार एका टोस्टर एवढा आहे. या किटमध्ये मॉलिकुलर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे चाचणी किट अवघ्या 5 मिनिटात पॉजिटिव्ह रिझल्ट आणि 13 मिनिटात नेगेटिव्ह रिझल्ट देण्यास सक्षम आहे.

Leave a Comment