कोरोना : महिला खोकल्यामुळे स्टोअर मालकाने फेकून दिले लाखोंचे सामान

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसची नागरिकांमध्ये एवढी भिती निर्माण झाली आहे की, प्रत्येकजण सुरक्षेसाठी मास्क वापरत आहे. आजुबाजूची व्यक्ती शिंकली अथवा खोकली तरी देखील संसर्ग होण्याची भिती नागरिकांना वाटत आहे. अमेरिकेत अशाच प्रकारे एक महिला खोकल्याने किराणा स्टोअरमधील तब्बल 35 हजार डॉलर्सचे (जवळपास 26 लाख रुपये) सामान फेकून देण्यात आले आहे. या बाबतची माहिती स्टोअरच्या मालकाने फेसबुक पोस्टद्वारे दिली.

अमेरिकेच्या पेन्सलवेनिया येथील ग्रेटीस सुपरमार्केटमध्ये एक महिला आली व सर्व तेथील सर्व ताज्या वस्तूंवर, बेकरी सामान व इतर सर्व वस्तूंवर खोकायला लागली.

***Update ****Our produce department was fully stocked by 2 PM today (Thursday). Thank you to everyone who worked so…

Posted by Gerrity's Supermarket on Wednesday, March 25, 2020

महिलेलो कोरोना व्हायरसची लागण होती की नाही याबाबत अद्याप माहिती नाही. मात्र लवकरात लवकर महिलेची चाचणी केली जाणार आहे.

स्टोअरचे मालक फासुला यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, ही महिला प्रँक करत असावी अशी देखील शंका आहे. मात्र आम्ही आमच्या ग्राहकांच्या आरोग्याविषयी कोणताही धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे सामान फेकून देण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता.

यानंतर ग्रेटीस सुपरमार्केटने पोलिसांना बोलवले व कर्मचाऱ्यांनी या स्टोअरला स्वच्छ केले. स्टोअरच्या मालकाने लिहिले की, हे प्रकरण जिल्हा अटॉर्नी कार्यालयात गेले असून, त्यांनी मला आश्वासन दिले आहे की याबाबत दंड आकारला जाईल.

Leave a Comment