कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी धावले साईबाबा…! देवस्थान करणार ५१ कोटींची मदत


शिर्डी : आता शिर्डी देवस्थान संस्थानही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. राज्य सरकारला शिर्डी देवस्थानच्या वतीने ५१ कोटींची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ही मदत राज्य सरकारकडे न्यायालयाने नेमलेल्या कमिटीच्या निर्णयानंतर देण्यात येणार आहे. तसेच संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणि गरजू लोकांसाठी देवस्थानच्या वतीने मोफत अन्नदानही करणार आहे.

कोरोनाच्या रुग्णांची राज्यातील संख्या वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यामुळे उद्योग धंदे बंद असल्याने संपूर्ण राज्याच्या अर्थ व्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाला आहे. राज्याच्या तिजोरीवर अशा काळात अधिक ताण येत असतो. त्यामुळे हा ताण कमी करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था आणि व्यावसायिक आर्थिक मदत घेऊन पुढे सरसावले आहेत. त्यातच शिर्डी देवस्थाननेही ५१ कोटींची मदत जाहीर केली आहे.

Leave a Comment