MyGov ने लाँच केले कोरोना हेल्पडेस्क चॅटबॉट

माय गव्हने (MyGov) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकसोबत मिळून युजर्ससाठी कोरोना हेल्पडेस्क चॅटबॉट लाँच केले आहे. युजर्सला या चॅटबॉटवर कोरोनासंबंधी माहिती मिळेल. सोबत माय गव्हच्या अधिकृत फेसबुक पेज MyGov Corona Hub वर देखील व्हायरसंबंधी माहिती मिळेल.

याबाबतची माहिती नॅशनल ई-गव्हर्नेंस डिव्हिजनचे सीईओ अभिषेक सिंह यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांनी सांगितले की, चॅटबॉट मेसेंजरवर काम करते. यात तुम्हाला विविध भाषेत कोरोनासंबंधी माहिती विचारता येईल.

दुसरीकडे सरकारने आपतकालिन स्थिती मदतीसाठी 011-23978046 आणि 1075 टॉल फ्री नंबर जारी केले आहेत.

फेसबुकच्या या चॅटबॉटमध्ये तुम्हाला कोरोना व्हायरसचे अपडटे, लक्षण व या संबंधी सर्व माहिती मिळेल. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पेजवर देखील सर्व माहिती मिळेल.

Leave a Comment