क्वारंटाईन मोडणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई आहे. खास करून कोरोनासंशयित जे क्वारंटाईनमध्ये आहेत, त्यांना घराच्या बाहेर न पडण्याचे सक्त आदेश आहेत. मात्र असे असताना देखील केरळमधील एक आयएएस अधिकारी क्वारंटाईन मोडत राज्य सरकारला सुचना न देता पळून कानपूरला पोहचला आहे.

अधिकाऱ्याच्या वर्तवणुकीमुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. कारण अधिकाऱ्याने काही दिवसांपुर्वीच सिंगापूरचा प्रवास केला होता. त्यामुळे त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. क्वारंटाईन मोडल्याने केरळ पोलिसांनी कोल्लमचे उप-जिल्हाधिकारी अनुपम मिश्रा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

कोल्लम पोलिसांनुसार, उप-जिल्हाधिकारी अनुपम मिश्रा सुट्ट्यांमध्ये सिंगापूरला गेले होते व तेथून परतल्यानंतर त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र मिश्रा नियम मोडत कानपूरला गेले.

अनुपम मिश्रा यांनी देखील स्विकार केले की लॉकडाऊन होण्याच्या आदल्या रात्री 23 मार्चला ते केरळवरून आपल्या घरी कानपूरला रवाना झाले होते.

Leave a Comment