कोरोना विरोधात भारतीय सैन्याचे ‘ऑपरेशन नमस्ते’

देशात कोरोना व्हायरसचा प्रसार वाढत चालला आहे. याच पार्श्वभुमीवर कोरोनाशी लढण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन नमस्तेची सुरूवात केली आहे. लष्करप्रमूख एमएम नरवणे यांनी याबाबत माहिती दिली. देशात कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सैन्याने एकूण 8 क्वारंटाईन केंद्र उभारले आहेत.

ऑपरेशन नमस्तेबद्दल सांगताना नरवणे म्हणाले की, या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी सरकारची मदत करणे हे कर्तव्य आहे. सैन्याने आतापर्यंत सर्व ऑपरेशन्स यशस्वीरित्या पार पाडली आहेत व ऑपरेशन नमस्ते देखील यशस्वीरित्या पार पाडले जाईल.

लष्करप्रमुख म्हणाले की, कोरोना व्हायरसच्या विरोधातील लढाई सरकार आणि नागरिकांची मदत करणे आमचे कर्तव्य आहे. एक लष्करप्रमुख म्हणून माझे कर्तव्य आहे की मी जवानांना सुरक्षित व फीट ठेवू. आपण आपल्या कर्तव्यांना तेव्हाच पुर्ण करू शकू, जेव्हा आपण सुरक्षित राहू.

नरवणे म्हणाले की, अशा काळात जवानांच्या सुट्टी रद्द केल्याने त्यांच्या मनोबलावर विपरित परिणाम होऊ शकतो, याची जाणीव आहे. मात्र 2001-02 मध्ये ऑपरेशन पराक्रमच्या काळात जवानांनी 8 ते 10 महिने सुट्टी घेतली नव्हती. जवानांनी आपल्या जवळच्या लोकांची काळजी करू नये. सैन्य त्यांची काळजी घेत आहे.

Leave a Comment