या शेफने चक्क बनवला कोरोना बर्गर

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लोक घरातच कैद आहेत. लोक आपल्या कुटुंबासोबत मजेत वेळ घालवत आहेत. मात्र घरात असताना काहीजण फावल्या वेळेत आपली कला देखील दाखवत आहेत. काही दिवसांपुर्वीच कोरोना भजींचा फोटो व्हायरल झाला होता. आता व्हियतनामच्या हनोई येथील एका शेफने चक्क कोरोना बर्गर बनवला आहे. या शेफचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीवर मात करायची असेल तर ती गोष्ट खावी.

या शेफचे नाव होंग तुंग असून, ते कोरोना बर्गरची मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत. बर्गरला व्हायरसप्रमाणे दाखवण्यासाठी ते पीठाद्वारे यात काट्यासारखा आकार देत आहेत.

होंग तुंग म्हणाले की, तुम्ही कोरोना व्हायरस सारखा बर्गर खाल्ला तर तुम्हाला त्याची भिती वाटणार नाही. या प्रकारे विचार केल्याने महामारीच्या काळात लोकांना आनंद होतो.

त्यांचे दुकान दररोज असे 50 बर्गर बनवत आहे. व्हियतनाममध्ये देखील व्यवसाय बंद करण्यता आले आहेत. काही ठराविक दुकानेच सुरू ठेवण्यात आली आहेत.

Leave a Comment