संकटातून जात असलेल्या देशासाठी सीआरपीएफ जवानांची आर्थिक मदत


नवी दिल्ली : कोरोनाशी दोन हात करण्यास संपूर्ण देश सज्ज झाला असून देशभरातील अनेक राज्यातून पंतप्रधानांच्या लॉकडाऊनच्या निर्णयाला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. आपला देश एका मोठ्या संकटातून जात असताना सीआरपीएफ जवानांनी मदतीचा हात पुढे केला आहे. आपल्या एका दिवसाच्या पगारातून जमा झालेली रक्कम जवानांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिली आहे. ३३.८१ कोटी इतकी रक्कम गोळा झाली आहे.

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्वांच्या सहमतीने एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सीआरपीफ प्रवक्त्यांनी सांगितले. सीआरपीएफ जवान देशासोबत खंबीरपणे उभे असल्याचे देखील ते म्हणाले. सीआरपीएफ सेवा आणि निष्ठेसहीत सदैव तत्पर राहीले, असेही ते म्हणाले. गृहखात्याच्या अंतर्गत येणारी सीआरपीफ आंतरिक सुरक्षा आणि नक्षलविरोधी कारवायांशी जोडली गेली आहे. यामध्ये साधारण सव्वा तीन लाखांची कमी आहे.

Leave a Comment