कोरोना : वैज्ञानिकांनी शोधली लस तयार करण्याची नवीन पद्धत

कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी अनेक देशातील वैज्ञानिक कार्य करत आहेत. आता सिंगापूरच्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, त्यांनी कोरोना व्हायरसवरील लस लवकरात लवकर शोधण्यासाठी नवीन पद्धत विकसित केली आहे. याद्वारे जीन्समध्ये होणारे बदल शोधून लसचे परिक्षण करण्यास वेग येईल.

रिपोर्टनुसार, ड्यूक-एनयूएस मेडिकल स्कूलमध्ये काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी संभावित लसीच्या परिक्षणासाठी ऑर्कट्यूरस थेराप्यूटिक्स नावाच्या अमेरिकन बायोटिक कंपनीशी भागिदारी केली आहे. वैज्ञानिकांच्या म्हणणे आहे की, त्यांच्या तंत्रज्ञानाद्वारे केवळ काही दिवसातच लसीची मुल्यांकन करणे शक्य होईल.

सर्वसाधारणपणे लसीची मनुष्यावर चाचणी केल्यानंतर त्याचे मुल्यांकन करण्यासाठी अनेक महिने लागतात. एनयूएस मेडिकल स्कूलचे इमर्जिंग इंफेक्शन्स डिजीज प्रोग्रामचे डिप्टी डायरेक्टर व्ही एंग योंग म्हणाले की, जीन्स जसजसे बदलतात, तसे तुम्हाला समजते की कोणते जीन्स सुरू आहेत व कोणते बंद आहेत. एका लसीद्वारे सक्रीय करण्यात आलेल्या या बदलांचा अभ्यास करून वैज्ञानिक लसीच्या चांगल्या व वाईट परिणामांचा शोध घेतील.

Leave a Comment