ही काळजी न घेतल्यास घरात होईल कोरोनाचा शिरकाव

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी एक चतृतांश जग आपल्या घरात कैद आहे. भारतात देखील 21 दिवस लॉकडाऊनचा आदेश सरकारने दिला आहे. व्हायरसपासून बचावासाठी लोक सोशल डिस्टेंसिंग पाळत आहेत. मात्र अनेकदा अत्यावश्यक वस्तू आणण्यासाठी बाहेर पडल्यानंतर देखील काळजी घेणे गरजेचे आहे, अन्यथा तुमच्या घरात कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो.

घरात क्वारंटाईन असताना घ्या काळजी –

यासाठी घरात हवा येणारी खोली निवडा. खोलीत शौचालाय असावे. गरजेच्या वस्तू जवळच ठेवा. घरातील सार्वजनिक वस्तूंना स्पर्श करणे टाळा. प्रत्येक वेळी मास्क लावा. वृद्ध, गर्भवती महिला आणि लहान मुलांपासून लांब रहा.

दूधाची पिशवी धुण्यास विसरू नका –

भाजी, औषधे आणि दूध या सारख्या गोष्टी बाजारातून आणण्यासाठी निश्चित वेळ ठरवा. याशिवाय बाहेरून दूधाची पिशवी आणली तर त्याला धुण्यास विसरू नका. तसेच बाहेरून आल्यावर हात स्वच्छ करावेत.

भाज्यांना मिठाच्या पाण्याने स्वच्छ करा –

बाजारातून भाजीपाला आणल्यानंतर मिठाच्या पाण्याने धुतल्यावरच त्याचा वापर करा.

एटीएममध्ये हातमोजे घालून जा –

एटीएमचा वापर करताना हातमोज्यांचा नक्की वापर करा. कारण स्क्रीन आणि बटनांवर असंख्य जंतू असतात व यामुळे तुम्ही आजारी पडू शकतात.

कॉम्प्यूटर, लॅपटॉप कमीत कमी वापरा –

जर तुम्ही घरून काम करत नसाल, तर या डिव्हाईसचा वापर कमीत कमी करा. लॅपटॉपवर काम करताना हात अनेक ठिकाणी लागतो, त्याच हाताचा स्पर्श नंतर घरातील अनेक गोष्टींना होतो. त्यामूळे जंतू सर्वत्र पसरण्याचा धोका असतो.

घरी काम करणाऱ्यासाठी कामवाल्यांची मदत घेऊ नये –

तुमच्या घरी काम करण्यासाठी घरकाम करणाऱ्या मावशींची किंवा इतर कोणाची मदत घेऊ नये.  हे कर्मचारी अनेक घरी काम करत असतात व अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना काही दिवसांची सुट्टी देऊन, स्वतःच काम करावे.

ग्रुप स्टडी करू नये –

शाळा, कॉलेज बंद असल्याने विद्यार्थी देखील घरीच आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांनी ग्रुप स्टडी करणे टाळावे.

Leave a Comment