कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांचा स्फुर्तिदायक व्हिडीओ एकदा नक्की पहा…

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी आपण सर्वजण घरात आपल्या कुटुंबासोबत आहोत. मात्र जगभरातील डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ दिवस-रात्र काम करत कोरोना व्हायरसवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर अशाच काही डॉक्टरांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये कोरोनाशी लढणारे हे सर्व डॉक्टर छ ‘छोड़ो कल की बातें…’ गाणे गात आहे. हे गाणे 1961 मध्ये आलेल्या ‘हम हिंदूस्तानी’ या चित्रपटातील असून, गाणे प्रसिद्ध गायक मुकेश यांनी गायले आहे.

या व्हिडीओला रोहित कुमार सिंह नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केले असून, त्याने व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, राजस्थानच्या भीलवाडा येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये कोव्हिड-19 च्या एपीसेंटरमध्ये डॉक्टर मुश्ताक, गौर, प्रजापत, मुकेश, साई, ज्ञान, उर्वशी आणि जालम कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी सातही दिवस 24 तास काम करत आहेत. यांना सलाम करा. हेच खरे हिरो आहेत.

सोशल मीडियावर डॉक्टरांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून, युजर्स या अवघड परिस्थितीत देखील समोर येऊन मदत करण्यासाठी डॉक्टरांचे आभार मानत आहेत.

Leave a Comment