कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंजाब आणि महाराष्ट्रातील कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाबमधील 6 हजार तर महाराष्ट्रातील 11 हजार कैद्यांना सोडले जाणार आहे.
कोरोना : महाराष्ट्र-पंजाबमधील हजारो कैद्यांची होणार सुटका
महाराष्ट्रात 7 वर्षांपेक्षी कमी शिक्षा असणाऱ्या 11 हजार कैद्यांना पॅरोलवर सोडले जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमूख यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिली. राज्यातील एकूण 60 कारागृहात हा निर्णय लागू होईल.
पंजाबमधील 6 हजार कैद्यांनी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाबचे जेलमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाद्वारे गठित करण्यात आलेल्या उच्चस्तरिय समेतीद्वारे सर्व मापदंड आणि प्रक्रियांचे पालन करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दीर्घकालीन शिक्षा असणाऱ्यांना पॅरोलवर तर काहींना अंतरिम जामिनावर सोडले जाईल.
यात अशा कैद्यांचा समावेश आहे. ज्यांना 7 वर्षांची शिक्षा झाली आहे. तसेच त्यांच्यावर 2 पेक्षा अधिक खटले दाखल नसावे व मागील पॅरोलमध्ये त्यांची वागणूक चांगली असावी. याआधीच पॅरोलवर गेलेल्या कैद्यांचा कालावधी 6 महिने वाढवला जाईल.
पंजाबच्या जेलमंत्र्यांनी स्पष्ट केले की, पोक्सो कायदा, आयपीसीचे कलम 376, 389बी, अॅसिड हल्ला, यूएनपीए आणि परदेशी नागरिकत्व अंतर्गत शिक्षा झालेल्यांना कैद्यांना सोडले जाणार नाही.