सांगलीतील १२ रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, महाराष्ट्राचा आकडा १४७ वर


सांगली – सांगलीत १२ नवे कोरोनाग्रस्त आढळल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १४७ वर पोहचला आहे. ही बातमी महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंता वाढवणारी असल्याचेच म्हणता येईल. सांगलीत १२ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. या १२ जणांना कोरोनाची लागण इतरांच्या संपर्कात आल्याने झाली आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

सांगलीतील एकाच कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सांगलीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २३ वर पोहचला असून सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहून चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. एकाच कुटुंबातील १२ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने इस्लामपुरात कडक निर्बंध पाळण्यात येणार आहेत. कोणीही घराबाहेर पडणार नाही. एकच व्यक्ती बाहेर पडणार, त्या व्यक्तीच्या हातावर स्टॅम्प मारण्यात येणार. कोरोना पॉझिटिव्ह जे रुग्ण आढळले आहेत. त्यांच्या घराजवळचे भाग बंद केले जाणार. त्या भागात कोणालाही जाता येणार नाही. तिथे कुणाला खरेदी करायची असेल तरीही एकच व्यक्ती बाहेर जाणार, असे जयंत पाटलांनी म्हटले आहे.

Leave a Comment