राज्य सरकारचा मोठा निर्णय, पुण्यात उभारणार राज्यातील पहिले कोरोना रुग्णालय


पुणे : राज्यातील ठाकरे सरकार राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता वेळोवेळी महत्त्वाचे निर्णय घेत आहे. सध्या पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून पण ही संख्या जर वाढतच गेली तर हे रुग्णालय पुरेसे पडणार नाही. या दृष्टीने पुण्यातील ससून रुग्णालयात राज्यातील पहिले कोरोना रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी ससून रुग्णालयाची नवी ११ मजली इमारत कोरोनाबाधित रुग्णांसाठी तयार करण्यात येत आहे.

पुणे शहरात १८, पिंपरी चिंचवड मध्ये १२, आणि राज्यतील इतर ठिकाणी मिळून कोरोना बाधितांचा आकडा आज (ता. २७) १३० वर पोहचला आहे. हि आकडेवारी पाहता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकार ससून रुग्णालयाची ही इमारत केवळ कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात येत आहे. यात दिलासादायक बाब अशी की, काही कोरोनाबाधित रुग्णांची पुन्हा चाचणी केली असता त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.

Leave a Comment