13 वर्षांपुर्वी वैज्ञानिकांनी दिली होती कोरोनाची चेतावणी

मागील 4 महिन्यापासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसबाबत हाँगकाँगच्या 4 वैज्ञानिकांनी 13 वर्षांपुर्वीच आपल्या रिसर्च रिव्ह्यूमध्ये जगाला चेतावणी दिली होती. या वैज्ञानिकांनी सांगितले होते की, लवकरच चीनच्या वन्यजीव बाजारातून सार्स सारखा नवीन व्हायरस निर्माण होईल. मात्र त्यावेळी कोणीच या चेतावणीकडे लक्ष दिले नव्हते.

12 ऑक्टोंबर 2007 ला हाँगकाँग विद्यापीठाचे वैज्ञानिक विसेंट सीसी चेंग, सुसन्ना केपी लाउ, पॅट्रिक सीवाई वू आणि क्वॉक युंग यूएन यांचा एक रिसर्च अमेरिकन सोसायटी फॉर मायक्रो बायोलॉजीमध्ये प्रकाशित झाला होता.

वैज्ञानिकांनी जगभरात व्हायरसवर झालेल्या संशोधनावर अभ्यास केला होता. याद्वारे निष्कर्ष काढला होता की, 2002 मध्ये दक्षिण चीनच्या वन्यजीव बाजारातून जसा सार्स सारखा व्हायरस निर्माण झाला. तसाच पुढे वटवाघूळ इत्यादीद्वारे कोव्हिड-2 व्हायरस पसरू शकतो.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, अनेक जीवांमधून व्हायरस वटवाघळात पोहचला व तो अनेकपट ताकदवर होऊन बाहेर पडला. प्राण्यांनी आपल्या बचावासाठी व्हायरस विकसित केला आहे.

वैज्ञानिकांच्या या चेतावणीनंतर देखील अनेक सरकारने याकडे दुर्लक्ष केले व आज त्याचा परिणाम संपुर्ण जगात पाहण्यास मिळत आहे.

Leave a Comment