या फॅशनेबल कासवाला आवडते द्राक्षाची वाईन


फोटो सौजन्य पत्रिका
जगात काय ऐकावे ते नवल म्हणावे अश्या अनेक घटना घडत असतात. सध्या जगभरात करोनाचा खौफ असताना काही हलकेफुलके ऐकले, वाचले तरी मनाला विरंगुळा मिळतो. तर आम्ही सांगतोय एका कासवाबद्दल. इथेल नावाचे हे कासव केसी आणि डॅनियल या जोडप्याने आपल्या मुलाप्रमाणे पाळले आहे. इथेल या कुटुंबाचा एक सदस्यच आहे. केसी आणि डॅनीयल तिला ते जेथे जातील तेथे नेतातच पण तिला वेगळे वाटू नये म्हणून त्याच्या रंगाशी मिळतेजुळते कपडे घालतात. या तिघांचा कौटुंबिक फोटो सोशल मिडियावर जेव्हा शेअर केला गेला तेव्हा लोकांना तो खुपच भावला.


केसी फॅशन डिझायनर आहे. तिने इथेलसाठी सुद्धा अनेक प्रकारच कपडे बनविले आहेत आणि इथेलला ते घालणे खुपच आवडते. तसे इथेलला द्राक्षाची वाईन सुद्धा खूप प्रिय आहे. इथेलला केवळ नवे कपडे आणि वाइनच मिळते असे नाही तर दर आठवड्याला मसाज, स्पा ही दिला जातो. इथेलच्या दिवसाची सुरवात केसी आणि डॅनियल सोबत योगासनाने होते. तिला बाहेर फिरायला खूप आवडते आणि छान छान ड्रेस घालून इथेल फिरतेही. अर्थात काही प्राणीप्रेमी संघटना आणि युजर्सनी इथेलला असे घरात कैद केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे पण अनेकांना इथेल, केसी आणि डॅनियल यांच्यातील भावबंध खूप आवडले आहेत आणि त्यांनी या तिघांचे कौतुक केले आहे.

Leave a Comment