दक्षिण कोरियात ‘रुग्ण 31’ मुळे 5 हजार जणांना झाला कोरोनाचा संसर्ग

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेले आहे. चीनच्या जवळच असलेल्या दक्षिण कोरिया देखील या व्हायरसच्या प्रसारापासून वाचलेला नाही. दक्षिण कोरिया हा प्रसार रोखणयासाठी पावले देखील उचलत आहे. मात्र कोरियामध्ये एका 61 वर्षीय महिलेमुळे हजारो जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले.

हजारो जणांना कोरोनाने संक्रमित केलेल्या या 61 वर्षीय महिलेला ‘रुग्ण 31’ असे नाव देण्यात आले आहे. या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे असतानाही, तिने अनेक सार्वजनिक ठिकाणी प्रवेश केला होता.

दक्षिण कोरियातील डेंइगू येथील शिनचेउंजी चर्च हे देशात कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरण्याचे कारण ठरले आहे. कारण रुग्ण 31 या महिलेने कोरोनाची लक्षण असताना या चर्चमध्ये उपस्थिती दर्शवली होती.

महिलेला दोनदा कोरोनाची चाचणी करण्यास सांगण्यात आले होते. मात्र महिलेने नकार दिला होता. अखेर मागील आठवड्यात महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

चर्चमध्ये ही महिला 1200 जणांच्या संपर्कात आली होती.  यानंतर ती इतर चार सार्वजनिक ठिकाण देखील गेली होती. ज्यामुळे तिच्या संपर्कात हजारो लोक आले व अनेकांना या व्हायरसचा संसर्ग झाला. महिला लक्षण असताना एका रेस्टोरेंट, दक्षिण कोरियाच्या पद्धतीचे बाथमध्ये देखील गेली होती व दोन वेळी शिनचेउंजी चर्चमध्ये गेली होती.

महिलेमध्ये कोरोनाची लक्षण असतानाही तिने चाचणी करण्यास नकार दिला व या परिस्थितीमध्ये ती सार्वजनिक ठिकाणी वावरत होती. त्यामुळे तिच्या मार्फत हजारो लोकांना या व्हायरसची लागण झाली. आता आरोग्य अधिकारी चर्चमध्ये आलेल्या 9,300 जणांची तपासणी करत असून, यातील जवळपास 1,261 जणांमध्ये कफ आणि इतर लक्षण आढळली आहेत.

Leave a Comment