ओडिशात उभारले जाणार 1 हजार बेडचे देशातील कोरोनाग्रस्तांसाठीचे पहिले हॉस्पिटल

कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहून ओडिसा सरकार देशातील सर्वात मोठे कोव्हिड-19 हॉस्पिटल उभारणार आहे. या हॉस्पिटलमध्ये 1 हजारांपेक्षा अधिक बेड असतील. पुढील 15 दिवसात हॉस्पिटलचे काम सुरू होईल.

ओडिशा सरकार, कॉर्पोरेट्स आणि मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी 1000 बेडचे हॉस्पिटल उभारण्यासाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली.

खास कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी वेगळे हॉस्पिटल उभारणारे ओडिसा हे देशातील पहिलेच राज्य आहे. ओडिशामध्ये आतापर्यंत कोरोनाची केवळ 2 जणांना लागण झाली आहे. हे हॉस्पिटल कोठे उभारले जाईल, हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही.

तर दुसरीकडे असाम सरकारने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी इंदिरा गांधी एथलेटिक्स स्टेडियमला आयसोलेशन सेंटरमध्ये बदलले आहे. असाममध्ये अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही.

Leave a Comment