कोरोनासंदर्भात गुगलवर हे सर्च केल्यास होईल मोठे नुकसान

कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने वाढत असल्याने या पासून बचावासाठी व माहितीसाठी लोक गुगलवर सर्च करत आहेत. मात्र गुगलवर सर्च करून अनेकदा चुकीचे औषध घेतले जाते, तर काहीजण हॅकर्सचे शिकार होत आहेत. त्यामुळे कोरोना संबंधी गुगल सर्च करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोनाची वेबसाईट –

कोरोना व्हायरससंबंधी आतापर्यंत अधिकृत वेबसाईट लाँच करण्यात आलेली नाही. जर कोरोनासंबंधी माहिती हवी असल्यास जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अधिकृत वेबसाईटची मदत घ्यावी. त्यामुळे इतर साईटवर जाऊन हॅकिंगचा शिकार होऊ नये.

होम टेस्ट किट –

कोरोना व्हायरसची होम टेस्ट किट अद्याप बाजारात उपलब्ध नाही. जर तुम्हाला या व्हायरसची लक्षण जाणवत असल्यास सरकारच्या हेल्प लाइन नंबरशी संपर्क साधावा. सोबतच जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करावी.

औषध –

कोरोनासंबंधी औषध गुगलवर सर्च करू नये. कारण चुकीच्या औषधांमुळे प्राण जाण्याचा धोका असतो.

कोरोना व्हायरसवरील उपचाराचा व्हिडाओ –

गुगल प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडीओ बनावट आहेत. त्यामुळे असे व्हिडीओ गुगलवर सर्च करू नयेत. सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सच फॉलो करावे. गुगलवर चुकीची माहिती सर्च केल्याने, तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

Leave a Comment