चीनमध्ये ‘तो’ पुन्हा परत आला आहे ! १०% रुग्णांना पुन्हा लागण


नवी दिल्ली – चीनमधील कोरोनाग्रस्त्यांच्या संख्येत गेल्या महिन्याभरात कमी आली असतानाच गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा चीनने केला आहे. चीनमधील जवळजवळ ७८ हजार नागरिक कोरोना मुक्त झाली आहेत, तर सध्या केवळ ५ हजार लोक उपचार घेत आहेत. पण आता चीनसमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. कोरोनापासून निरोगी झालेल्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

यासंदर्भातील वृत्त दक्षिण चीन मॉर्निंग पोस्टने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार कोरोनापासून निरोगी झालेल्या वुहानमधील रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. पुन्हा कोरोनाची लागण होण्यामागील कारण अद्यापही आरोग्य विभागातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनासुद्धा समजू शकलेले नाही. पण जी औषधे कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान वापरली जातात, त्याचा परिणाम संपल्यानंतर पुन्हा शरीरात कोरोना विकसित होतो की काय अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

पीपल्स डेलीच्या हेल्थ जर्नल लाइफ टाईम्सनेही दावा केला आहे की वुहानमध्ये बरे झालेल्या कोरोना रूग्णांपैकी १०% रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. तसेच रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांपैकी ८% ते १०% रुग्णांना पुन्हा कोरोना संसर्ग होण्याची चिन्हे दिसू लागल्यामुळे एकाठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होत असल्यामुळे चीनसमोर आता नवीन संकट उभे राहिले आहे.

Leave a Comment