व्हिडीओ : क्वारंटाईनमध्ये या पठ्ठ्याने मुलीला असा दिला स्वतःचा नंबर

जगभरात कोरोना व्हायरसमुळे शहर लॉकडाऊन करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत लोक घरात कैद आहेत. यामुळे लोकांना आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटणे देखील शक्य नाही. मात्र अशा परिस्थितीत न्यूयॉर्कमधील एक विचित्र प्रकार समोर आला आहे. क्वारंटाईनमध्ये असताना येथील एका युवकाने हटके पद्धतीने एका मुलीकडे नंबर मागितला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

न्यूयॉर्कमध्ये क्वारंटाईनमध्ये असलेल्या युवकाने आपल्या बाल्कनीमधून एका मुलीला छतावर डान्स करताना पाहिले. युवक त्या मुलीला बाल्कनीमध्ये हात देखील दाखवतो व ती देखील त्याला परत उत्तर देते. यात पुढची खास गोष्ट म्हणजे हा युवक या अनोळखी मुलीला चक्क ड्रोनच्या मदतीने स्वतःचा नंबर पाठवतो.

एका कागदावर स्वतःचा नंबर लिहून ड्रोनमध्ये अडकवतो व नंतर ड्रोन त्या मुलीपर्यंत पोहचवतो. विशेष म्हणजे ती मुलगी देखील नंतर त्याला मेसेज करते.

या संपुर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओ आतापर्यंत 5 मिलियन पेक्षा अधिक जणांनी पाहिले आहेत. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Comment